पेट्रोल डिझलचा दर महाराष्ट्रात कमी होणार? मुख्यमंत्रांची घोषणा

सध्या महाराष्ट्रात राजकीय वादळ शांत झालं आहे. सत्तांतर नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. यातच महाराष्टाच्या नवीन सरकारने आता एक दिलासादायक घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आता लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहे. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने 164 मते पडली त्याचवेळी विरोधात फक्त 99 मते पडली. तर एक दिवस आधी रविवारी सभापती निवडीच्या वेळी 107 मते विरोधकांकडे होती. म्हणजेच कालच्या तुलनेत आज विरोधकांची 8 मते कमी झाली आहेत. सपा आणि ओवेसी यांच्या पक्षाने मतदानात भाग घेतला नाही.

या भाज्यांच्या लागवडीमुळे पावसाळ्यात होईल बंपर कमाई, जाणून घ्या कशी

यावेळी त्यांनी हि मोठी घोषणा केली, मोदी सरकारने केंद्राचा व्हॅट कमी केला आणि त्यांनतर त्यांनी राज्यांना देखील विनंती केली होती त्यावेळी काही राज्यांनी टॅक्स कमी केले.मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कर कमी केला नव्हता. आजच्या अधिवेशनात केलेल्या भाषणात मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरत लवकर पेट्रोल डिझेल वरील टॅक्स कमी करू अशी घोषणा केली. तसेच हिरकणी गावासाठी देखील त्यांनी २१ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

काय आणि किती असतो पेट्रोल डिझलवर लागणार टॅक्स पाहुयात…

सध्या भारत देश १०३ डॉलर ७६ सेन्ट प्रति बेरल एवढ्या किमतीने कच्च तेल विकत घेतो, एक बेरल म्हणजे १५८.९८ इतर जवळ जवळ १५९ लिटर, त्यानंतर ते कच्च तेल रेफाईनरी मध्ये जाऊन त्यातून डिझेल, पेट्रोल, रॉकेल वेगळं केलं जात. नंतर ते जाणते पर्यंत येण्यासाठी तय्यार होत . केंद्राचे टॅक्स बद्दल बोलायचं झालं तर १०० रुपयांच्या पेट्रोल वर जवळ जवळ आपल्याला प्रतिलिटर पेट्रोलवर ४९.०९ रुपये कर सरकारी तिजोरीत जातो. 27.90 रुपये उत्पादन शुल्क आणि 17.13 रुपये व्हॅट तसेच महाराष्टाचा विचार करायचा झाला तर ३ रुपये प्रति लिटर व्हॅल्यूऍडेड टॅक्स आणि २४% व्हॅट डिझल वर तर १०.१२ रुपये प्रति लिटर व्हॅल्यूऍडेड टॅक्स आणि २५% व्हॅट लागेल. म्हणजे तर तुम्ही १०० रुप्याचे पेट्रोल भरलं तर तुम्हाला जवळ जवळ १७ रुपया पर्यंत व्हॅट आणि जवळ जवळ ८ रुपया पर्यंत व्हॅल्यूऍडेड टॅक्स द्यावाल लागेल. म्हणजे तुम्ही पेट्रेल भरल्या नंतर टॅक्स स्वरूपात १०० रुपयांच्या पेट्रोल मागे २१ रुपये सरकरूची तीजोरीत देता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *