आज औरंगाबादचं संभाजीनगर होणार ? शिवसेनेच्या टिझर वरून चर्चेला उधाण

आज औरंगाबाद मध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आहे. या सभेची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जोर धरत आहे. मराठवाड्यात सर्वप्रथम सुरु झालेल्या शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या 36  व्य वर्धापन दिना निमित्त हि सभा घेण्यात येणार आहे. या सभेवर विरोधकांचे देखील खास लक्ष लागून आहे. तसेच सभेपूर्वी औरंगाबादेत विरोधी पक्ष भाजपने मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी करत बेनेर देखील लावले आहे. तसेच शहरात झालेल्या बहुतांश योजना भाजपच्या काळात झाल्या असे हि भाजप म्हणत आहे.

हेही वाचा :

दरम्यान, या सभेचा मुख्य मुद्दा औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, या उद्यावर देशभरातून लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच शिवसेनेने रिलीझ केलेल्या सभेच्या चौथ्या टिझर मध्ये नामांतराचा मुद्दा नाही यावरून काही विरोधक टीका देखील करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा स्टेजच्या एका बाजूला ठेवण्यात आला आहे. तसेच सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असल्यानं संभाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. औरंगाबाद शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी हजारो झेंडे मागवण्यात आले आहेत. या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. सभेसाठी दीड हजार पोलिसांचे सुरक्षा कवच आहे. यामध्ये 5 डीसीपी, 7 एसीपी, 30 पीआय, 100 पीएसआय आणि 1200 पोलीस असणार आहे. तर एसरपीएफच्या तब्बल 2 तुकड्या याठिकाणी तैनात असतील. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या निगरानीखाली हजारो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *