आमच्या मुलीला कोणी गोवले तर आम्ही शांत बसणार नाही, लव्ह जिहादवर राणा संतापल्या

अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लव्ह जिहाद प्रकरणात फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणाने केला आहे.

याबाबत राजापेठ पोलिस ठाण्यात खासदार आक्रमक झाल्या आणि पोलिसांशी बाचाबाची झाली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पोलीस ठाण्यात एका हिंदू मुलीला समाजातील मुलाने पळवून नेल्याच्या मुद्द्यावरून नवनीत राणा आक्रमक झाल्या.

पोलिसांनी लोकप्रतिनिधीचा फोन रेकॉर्डिंग केल्याच्या आरोप नवनीत राणा यांनी केला . या प्रकरणी पोलिसांना जाब विचारताना नवनीत राणांचा पारा चांगलाच चढला होता.. तर पोलिसांनी देखील नवनीत राणांचे आरोप फेटाळून लावत तेवढच्याच त्वेषाने प्रत्युत्तर दिलं. अमरावतीत एका कॉलेज तरुणीला पळवून नेत तिचा आंतरधर्मीय विवाह करण्यात आल्याचा आरोप होतोय.. २४ तास होऊनही मुलीचा शोध लागलेला नाही. या प्रकरणी पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप राणांनी केलाय.

 

सोयाबीनचे बंपर पीक येण्याचा अंदाज, तज्ज्ञांनी सांगितले की भाव 4,500 रुपयांनी येण्याची शक्यता !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *