जागतिक स्थरावर दोन पदक मिळवणारी विनेश फोगट बनली पहिली भारतीय महिला
महिला कुस्तीपटू विनेश फोगटने बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. जागतिक स्पर्धेतील हे तिचे दुसरे पदक आहे. यापूर्वी तिने नूर सुलतान जागतिक स्पर्धेमध्येही कांस्यपदक जिंकले होते. विशेष म्हणजे, जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.
लम्पी त्वचा रोग : मराठवाड्यात 197 गुरांना लागण, 43 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण
विनेश फोगटने ५३ किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत स्वीडनच्या जोना माल्मग्रेनचा ८-० असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. याआधी दहावी मानांकित विनेश फोगट मंगळवारी पात्रता फेरीत पराभूत झाली होती. पात्रता फेरीत तिला मंगोलियाच्या खुल्लान डक्कुयागने पराभूत केले होते. पात्रता फेरीत पराभूत झाल्यानंतर विनेशला रॅपचेस फेरी खेळावी लागली. तिला पात्रता फेरीत पराभूत करणाऱ्या मंगोलियन कुस्तीपटूने अंतिम फेरी गाठली. अशा परिस्थितीत विनेशला रॅपचेस फेरी गाठण्याची संधी मिळाली. रॅपचेस फेरीच्या पहिल्या सामन्यात विनेशने कझाकिस्तानच्या झुल्दिझ अशिमोवाचा पराभव केला. कांस्यपदकाच्या लढतीत तिने स्वीडनच्या कुस्तीपटूला एकही संधी दिली नाही आणि विजय प्राप्त केला.
‘रिचा चड्ढा आणि अली फजल’ ११० वर्षे जुन्या ‘आयकॉनिक हॉटेलमध्ये’ बांधणार ‘लग्नगाठ’
दरम्यान, विनेश फोगाटने राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्ण जिंकले आहेत. तसेच नूर सुलतान जागतिक स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले आहे. याशिवाय विनेशने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सात पदके जिंकली आहेत. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत गुडघ्याच्या दुखापतीमुळे विनेशचे पदक हुकले होते.