‘रिचा चड्ढा आणि अली फजल’ ११० वर्षे जुन्या ‘आयकॉनिक हॉटेलमध्ये’ बांधणार ‘लग्नगाठ’

c नुकत्याच आलेल्या बातम्यांमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाची तारीख उघड केली होती. त्यानंतर आता ताज्या अपडेटनुसार दोघांच्या लग्नाच्या ठिकाणाची माहिती मिळाली आहे. ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांचे लग्न दिल्लीतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये पार पडणार आहे.
ताज्या वृत्तानुसार, ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांचा विवाह दिल्लीतील प्रसिद्ध दिल्ली जिमखाना क्लबमध्ये होणार आहे. या क्लबची स्थापना 1913 मध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच या ऐतिहासिक क्लबच्या सदस्यांमध्ये अनेक मोठी नावे आहेत. या दोघांनी २०२० मध्येच लग्नाचा प्लॅन बनवला होता, पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे त्यांनी लग्नाचा बेत थांबवला. ज्याचे आता पुन्हा नियोजन केले जात आहे.

पुन्हा नव्या रंगात माधुरी; ‘मजा मा’ चा फर्स्ट लुक आऊट

मुसळधार पाऊस शेतकऱ्यांसाठी ठरतोय आपत्ती, शेतात पाणी साचल्याने कडधान्य पिकांचे मोठं नुकसान

अली फजल आणि रिचाच्या लग्नाबाबत आलेल्या सर्व बातम्यांनुसार, हे लग्न अगदी शाही पद्धतीने पार पडणार आहे. इंडस्ट्रीतील आणखी एका पॉवर कपलच्या लग्नाचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लग्नाआधी ठरवलेले ठिकाण खूपच प्रेक्षणीय आहे. छायाचित्रे पाहून असे देखील म्हणता येईल की हे आयकॉनिक हॉटेल आतून खूप भव्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *