हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणी विक्की नगराळे दोषी, फैसला मात्र उद्द्या
गेल्या दोन वर्षापूर्वी घडलेली हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणाचा निकाल उद्द्या १० फेब्रुवारी रोजी लागणार आहे.एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकेश (विक्की) नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० रोजी शिक्षिकेला भररस्त्यात पेटवले होते. यात त्या शिक्षिकेचा उपचारादरम्यान १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.
या गुन्ह्यात आरोपी विक्की नागराळे फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. ४२६ पानाचे आरोप पत्र, ६४ सुनावण्या आणि २९ साक्षीदारांची साक्षीदारांची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण होताना आज निकाल लागणार होता.
प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.
यात आरोपी विक्की नगराळे दोषी आहे मात्र शिक्षेवर उद्द्या फैसला होणार आहे. अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली .