उद्धव ठाकरे स्वतःला मर्द म्हणतात ना, मग अब्दुल सत्तारला अटक करा – नितेश राणे

मुंबई : राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरुद्ध भाजप हा संघर्ष टोकदार झाला असून दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशात शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा २०१७ मधील एक वादग्रस्त व्हिडिओ शेअर करत भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. तसंच अब्दुल सत्तार यांच्या अटकेची मागणी केली आहे.

हेही वाचा : आनंदाची बातमी : देशातील 14 कोटी शेतकऱ्यांना मोठा दिलासा, खत अनुदान वाढवणार मोदी सरकार

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला, अब्दुल सत्तार यांनी प्रभू हनुमानाचं नाव घेत शिवीगाळ केल्याचा दावा या ट्विट मध्ये राणे यांनी केली आहे. या व्हिडिओत अब्दुल सत्तार हे पोलिसांच्या उपस्थितीत काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करतानाही दिसत असून, कोणीसोबत तरी त्यांचा वाद सुरु आहे असेही दिसते

हेही वाचा : धनंजय मुडेंवर बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मा आंतराष्ट्रीय हनी ट्रॅप रॅकेटचा भाग?

‘शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार प्रभू हनुमानाबद्दल अर्वाच्च शिवीगाळ करत आहेत. उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणतात ना? तर या अब्दुल सत्तार यांना तुरुंगात डांबून दाखवा,’ असं आव्हान नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. राणे यांच्या आव्हानानंतर सत्ताधारी पक्षाकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेल.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नसून. आमदार राणे यांनी शेअर केलेल्या या वादग्रस्त व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी ‘द रिपोर्टर’ करत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *