देश

अंडर -१९ आशिया चषकात भारताचा आठव्यांदा विजय

Share Now

दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर अंडर -१९ आशिया चषकाचा अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा पराभव केला. या विजयासोबत भारताने आठव्यांदा आशिया चषक जिंकलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पावसाने ५० ऐवजी ३८ षटकांचा घेण्यात आला. भारताच्या गोलंदाजासमोर श्रीलंकेच्या फलंदाजसमोर हार मानली. श्रीलंकेला ३८ ओव्हरमध्ये केवळ १०६ धावा करता आल्या परंतु डकवर्थ लुईसच्या नियमाप्रमाणे भारताला १०२ धावांचे लक्ष्य मिळाले भारतीय संघाने १०२ धावा केवळ २२ षटकातच पूर्ण केलेय आहेत.

भारताचा सलामीवीर हरनूर सिंह स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशीनं नाबाद ५६ धावांची खेळी केली. तर, शेख रशीदनं ३१ धावांची संयमी खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवलं. महत्वाचं म्हणजे, भारतानं आठव्यांदा अंडर-19 आशिया चषक जिंकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *