महाराष्ट्रात ओमिक्रॉन लाट थोपवण्यासाठी सज्ज!

महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरियंटनं धडकी भरवली असताना राज्याच्या आरोग्य विभागाने ‘ब्ल्यू प्रिंट’ करून ही लाट थोपवण्याची तयारी केली आहे.
देशात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉनची येणारी ‘लाट’ थोपवण्याचे आव्हान राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि आरोग्य विभागासमोर असणार आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक चारशेंवर रुग्ण ओमिक्रॉनबाधित आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी प्राप्त रिपोर्टनुसार, मागील २४ तासांत ८ हजार ०६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, आठ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. राज्य सरकारने हा संसर्ग रोखण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. १५ जानेवारीपर्यंत उपलब्ध एकूण कोविड १९ बेडपैकी कमीत कमी ४० टक्के बेड सज्ज ठेवण्यात आली असल्याचे सर्व जिल्ह्यांनी सुनिश्चित करायला हवे, असे ब्ल्यू प्रिंटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
तीन दिवसांकरिता ऑक्सिजनच्या आवश्यकतेची तरतूद करावी आणि युद्धपातळीवर डॉक्टर आणि आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने भरती करावी. प्रत्येक विभागाला १० दिवसांपूर्वीच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या साठ्याबाबत लक्ष्य देण्यात आले, दरम्यान, ६० टक्के रुग्णांमध्ये सौम्य अथवा कोणतीही लक्षणे आढळणार नाहीत, असेही त्यात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *