क्राईम बिट

सिद्धू मुसेवाला प्रकरणातील ‘तो’ शुटर पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

Share Now

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर आलं होत. सिद्धू यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी पुण्याचे असल्याची माहिती हाती आली होती. आरोपी संतोष जाधव, सौरव उर्फ महाकाल या दोघांचं पुणे कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात ८ लोकांची छायाचित्रं समोर आली होते. यातील सौरव उर्फ महाकाल याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे.

हेही वाचा :

हातीआलेल्या माहिती नुसार, सौरव उर्फ महाकाल याचे खरे नाव सिद्धेश कांबळे असे सांगण्यात येत आहे. पुण्यातील नारायणगाव येथून त्याला लोकल क्राईम ब्रांचने अटक केली आहे. पुण्यातील एका कुख्यात गुंडाच्या हत्या प्रकरणी त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता त्यावरून पुणे ग्रामिणी पोलिसांना २० जून पर्यंत त्याची कोठडी देण्यात अली आहे. मुसेवाल प्रकरणातील संतोष जाधव याचा शोध पोलीस घेत असताना सौरव उर्फ महाकाल याची माहिती त्यांना मिळाली आणि पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले आहे.

दरम्यान, दरम्यान, मानसा जिल्ह्यात शुभदीप सिंह सिद्धू उर्फ ​​सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *