राज्यात लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होणार…

राज्याच्या पोलीस दलात लवकरच सुमारे सात हजार पोलीस शिपायांची भरती करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे गृहविभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाने या भरतीला यापूर्वीच मंजुरी दिली होती. तथापि, राज्यात कोरोनाकाळामुळे आणि एक ते दीड महिन्यांच्या दुसरा टप्पा असेल. ही भरती प्रक्रिया हाती घेता आलेली नव्हती.

हेही वाचा :- महिला पोलीस निरीक्षकासह, सहकारीही अँटी करप्शनच्या जाळ्यात

या भरतीसाठी पारदर्शक पद्धत अवलंबली जाईल, एकाचवेळी हाती घेतली जाईल आणि एक ते दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.
पोलीस भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रक्रिया निकष अधिक कडक करण्यात येणार आहे.

पोलीस भरती चा हा दुसरा टप्पा असेल,आधी पहिल्या टप्प्यात पाच आहे. हजार पोलिसांची भरती करण्यात आली असून पुढील वर्षी आणखी दहा हजार पदे भरून पोलीस खात्यातील पदांचा अनुशेष दूर करण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे. या निमित्ताने मोठी संधी तरुणाईला मिळणार आहे.

गडचिरोलित स्थानिक तरुणांना प्राधान्य
कोरोनाचे संकट तसेच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्याची विदूनामावली अद्ययावत नसल्याने पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली नाही.

गडचिरोलीत पोलीस शिपायांच्या १३६ जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत सर्वाधिक ७८ जागा इतर मागासवर्गासाठी आरक्षित आहेत.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३७. इतर प्रवर्गाला ३ ते ७. जागा आहेत. पदभरती जाहिरात निघाली आहे. सर्व ९३६ जागा गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांमधूनच भरण्यात येणार आहेत.

सरकारी नौकरी : ONGC मध्ये 3500 पेक्षा जास्त पदांसाठी रिक्त जागांची भरती, शिक्षण ITI पास या दिवसापर्यंत अर्ज करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *