पुण्याचा ‘हा’ कुख्यात गुंड देखील सिद्दू मुसेवाला खुनात होता सहभागी

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. सिद्धू यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी पुण्याचे असल्याची माहिती हाती आली असून. आरोपी संतोष जाधव, सौरव महाकाल या दोघांचं पुणे कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात ८ लोकांची छायाचित्रं समोर आली. त्यापैकी एकाला देहरादूनमधून पकडलं आहे. तर संतोष आणि सौरव हे दोघं पुण्यातील असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : थट्टा शेतकऱ्यांची : सरकारी हरभरा खरेदी केंद्र पुन्हा बंद

संतोष जाधवचं नाव पुणे मंचरमधील गुन्हेगार ओंकार उर्फ़ राण्या बाणखेलेच्या हत्या प्रकरणात समोर आलं होतं. ओंकारच्या हत्या प्रकरणात संतोष जाधव फरार होता. पुणे क्राइम ब्रांच संतोषचा शोध घेत आहे. संतोष जाधवनं ‘सूर्य उगवताच तुला संपवून टाकीन’ असं स्टेटस सोशल मीडियावर टाकलं होतं. यावर ओंकारनं लिहिलं होतं की, ‘कुणीही येऊ द्या, संतोषला भेटणार आणि ठोकणार’. यानंतर शूटरनं बाईकवरुन येत ओंकार बाणखेले ची एक ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्या हत्या केली होती. तेव्हापासून संतोष फरार आहे. आता त्याचं नाव सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात देखील समोर आलं आहे.

हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि सिद्धू मुसावालाच्या परिवाराची झाली भेट, केली ‘हि’ मोठी मागणी

दरम्यान, मानसा जिल्ह्यात रविवारी शुभदीप सिंह सिद्धू उर्फ ​​सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *