क्राईम बिट

आईच ठरली मुलाचा काळ, स्वतःच्या पाच महिन्याच्या बाळाचा केला खून

Share Now

सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे एक मन हेलावून टाकणारी घटना समोर अली आहे. स्वत:च्याच पाच महिन्याच्या मुलाचा उशिने तोंड दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आरती गायकवाड असे संशयित आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. उशिने तोंड दाबून खून केल्यानंतर याबाबतची माहिती स्वत:च आईने पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर लोणंद पोलिसांनी तिला अटक केली.

हे ही वाचा (Read This) रिक्रूटमेंट 2022: टपाल विभाग रिक्त जागा भरणार, शिक्षण ८ वी पास , या तारखेपूर्वी करा अर्ज

हाती आलेल्या माहिती नुसार, सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे 12 एप्रिल रोजी आपल्या पाच महिन्याच्या मुलाचा ब्लॅकेटमध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याचे आरती हिने गावात सर्वांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी मृत बाळावर अंत्यसंस्कार केले. परंतु, आपण केलेली ही मोठी चूक आहे हे या लक्षात आल्यानंतर तीने स्वत:च लोणंद पोलिसांना फोन करुन मी माझ्या बाळाचा खून केल्याचे सांगितले.

हे ही वाचा (Read This) खा. नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक, आजची रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागणार ?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरती गाडकवाड हिला तिच्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी तिच्याकडे अधित चौकशी केल्यानंतर तिने खुनाची कबुली दिली. चौकशीनंतर पोलिसांनी आरती गाडकवाड हिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान बाळाचा खून कोणत्या कारणामुळे केला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय आरती गाडकवाड हिच्या या कृत्याबद्दल नागरिकांतून संताप देखील व्यक्त केला जात आहे. आरती गाडकवाड हिने आपल्या मुलाचा खून का केला याबाबत लोणंद पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *