आता औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त सव्वा तासात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

सोलापूर-धुळे महामार्गाचं लोकर्पाण करण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादकरांसाठी आणखी एक आनंदाची घोषणा केली, औरंगाबाद ते पुणे दरम्यान नव्या द्रुतगती महामार्गाची घोषणा त्यांनी केली. दहा हजार कोटी रुपये खर्च करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जाईल असे त्यांनी संगीत. तो पूर्ण झाल्यावर औरंगाबादहून पुण्याला जाण्यास फक्त सव्वा तास अंतर लागेल. सध्या या अंतरासाठी पाच ते सहा तास लागतात. त्यामुळे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली ही घोषणा सत्यात उतरल्यानंतर औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या विद्यार्थीवर्ग, नोकरदार वर्ग जे पुण्यात काम करतात त्यांना सोईचे होईल.

हेही वाचा : शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी मोदी सरकार हे पाच दिवस विशेष मोहीम राबवणार

औरंगाबाद ते पुणे हा मार्ग बीड, पैठण, अहमदनगर असा असेल. तसेच सध्या या मार्गाचा आराखडा पूर्ण झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. हा मार्ग द्रुतगती असल्याने यात कुठेही थांबा नसेल. तसेच या मार्गावरून वाहने 140 किलोमीटर प्रतितास या वेगाने जाऊ शकतील. त्यामुळे प्रवाशांची वेळेत बचत होईल. या मार्गासाठी दहा हजार कोटी रुपयांची खर्च होईल, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.

हेही वाचा : आईच ठरली मुलाचा काळ, स्वतःच्या पाच महिन्याच्या बाळाचा केला खून

2024 पर्यंत जिल्ह्यात 25 हजार कोटींची कामे सुरु करून पूर्ण करणार असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला. शेंद्रा एमआयडीसी ते वाळूज असा 25 किलोमीटरचा पूल होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच मेट्रोसाठी दोन पूल होती. पहिला चिकलठाणा ते क्रांती चौक मार्गे रेल्वेस्टेशन हा 9 किमी लांबीचा असेल. तर दुसरा रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉइंटमार्गे सिडको बसस्टेशनपर्यंत 13 किमी लांबीचा असेल अशी घोषणा गडकरी यांनी केली.

नितीन गडकरी यांच्या हस्ते शहरातील धुळे-सोलापूर हायवेचे लोकार्पण रविवारी झाले. औट्रम घाटात या महामार्गाचे काम थांबले आहे. घाटात काही ठिकाणी वन खात्याच्या अडचणी आहेत. पूर्ण बोगद्यासाठी खूप खर्च होऊ शकतो. त्यामुळे काही ठिकाणी बोहदा कर काही ठिकाणी चार पदरी रस्ता असा पर्याय सूचवण्यात आला आहे. चौसाळा, पाचोड, धारगाव, आडूळ, गेवराई, पांढरी आणि पिंपळगावातील अंतर्गत रस्ते एकाच वेळी विकसित केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *