डॉ सुवर्णा वाजे यांचा खून कौटुंबिक वादासोबतच, पैशासाठी नाशिक पोलिसांच्या हाती आली महत्वाची माहिती
नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाने नाशिक शहरात खळबळ उडाली होती. डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजे यांच्यात कौटूंबिक वाद असल्या कारणाने खून कल्याचे समोर आले. यात आरोपी संदीप वाजेला मदत करणाऱ्याना देखील अटक झाली आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मूर्त स्वरूप दिले गेले. त्यांचा खून करून मृतदेह जाळला. त्यांच्या मोबाईलमधील माहिती डिलिट केली. मात्र, पोलिसांना मोबाइलमधून माहिती मिळाली असून, त्यातून बरेच सत्य बाहेर तपासा दरम्यान समोर आले .
डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजेचे विवाह्यबाह्य संबंध होते. त्याला दुसरे लग्न करायचे होते. यामुळे दोघांमध्ये कायम वाद होत असे, संदीपच्या विवाह्यबाह्य संबंधाची डॉ. सुवर्णा वाजे यांना माहिती होती. त्यांनी संदीपला घटस्फोट देण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. शिवाय संदीपने काही जमीन विकली होती. त्यातून त्याच्याकडे कोट्यवधी रुपये आले होते. यातले तीन ते साडेतीन कोटी रुपये डॉ. सुवर्णा वाजे यांना द्यावे लागले असते. त्याला हे पैसे त्यांना द्यायचे नव्हते. त्यामुळे संदीपने डॉ. वाजे यांना संपवल्याचे समोर आले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप वाजे याला मदत करणाऱ्या बाळासाहेब म्हस्के याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. बाळासाहेब म्हस्के हा संदीपचा मावसभाऊ आहे. मात्र तपासात बाळासाहेब म्हस्के तपासात सहकार्य करत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाळासाहेब म्हस्के याच्या पत्नीने १९९७ मध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणी २००० मध्ये निकाल लागला. बाळासाहेब म्हस्केला पाच वर्षांचा कारावास झाला. मात्र, उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाल्याने तो बाहेर होता. डॉ सुवर्ण वाजेचा खून करण्यासाठी संदीपला सहकार्य केल्याचे समोर आले आहे.