प्रेमात अडथळा ; पोटच्या लेकाचा आईने प्रियकराच्या मदतीने केला खून

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या लेकराचा खून एका मातेने केला आहे. हि घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये घडली आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची समोर आली . वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. विशेष म्हणजे मुलाचा खून केल्यानंतर तो गायब झाल्याची फिर्याद याच आईने पोलिसात केली होती . या प्रकरणी पोलिसांना आधीपासूनच मुलाच्या आईवर संशय होता. मुलाचे प्रेत पाहूनही तिला रडू आले नाही. तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करताना तिच्या चेहऱ्यावर कुठलीही दुःखाची भावना पोलिसांना जाणवली नाही.

वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवाराजवळील जंगलातल्या दरीत १७ फेब्रुवारीला पोलिसांना एक अनोळखी मृतदेह आढळला. पोलिसांनी डॉक्टरांना बोलावून कुजलेल्या या मृतदेहाचं जागेवरच शवविच्छेदन करून घेतले. त्यानंतर तो मृतदेह तलवाडा शिवारातील गट नंबर २५२ मधील शेतात पुरून टाकला होता. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

त्यानंतर मृतदेहाची ओळख पटावी, यासाठी पोलिसांनी शोधपत्रिका प्रसिद्ध केली होती. दरम्यान, वैजापूर ठाण्यात संगीता बागूल या महिलेने ११ फेब्रुवारी रोजी तिचा मुलगा सार्थक याचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली होती. वैजापूर पोलिसांचे एक पथक या प्रकरणी शिरूर येथे गेले होते. तेव्हा जंगलात सापडलेल्या या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांना बोलावून घेण्यात आले.

या प्रकरणात पोलिसांना सुरवाती पासून मुलाच्या आईवर संशय होता. मुलाचे प्रेत पाहूनही तिला रडू आले नाही. तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करताना तिच्या चेहऱ्यावर कुठलीही दुःखाची भावना पोलिसांना जाणवली नाही. त्यामुळे संगीता बागूल हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसानी चौकशी करताच तिनं गुन्ह्याची कबुली दिली.

सार्थकची आई संगीता बागूल हिचे गावातील साहेबराव पवार याच्याशी प्रेमसंबंध होते. हे संबंध सार्थक याला समजले होते. त्यामुळे यात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा काटा काढण्यासाठी दोघांनी खुनाचा कट रचल्याची कबुली आईनं दिली. यानंतर साहेबराव पवार या व्यक्तीस अटक कारण्याआधीच यानं विषप्राशन केलं. त्यावर आता रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *