माता न तू वैरणी, ६ महिन्याची मुलगी आणि २ वर्षांचा मुलाची आईनेच केली हत्या

संतापजनक घटना नांदेड जिल्ह्यामध्ये घडली आहे. मुलगा खायला मागतो  आणि मुलगी रडते म्हणून पोटच्या मुला-मुलीची हत्या करून आईनेच त्यांचे मृतदेह शेतात नेऊन जाळले, मन हेलावून टाकणारी हि घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : कांद्याचे भाव : शेतकऱ्यांचा इशारा – परिस्थिती न सुधारल्यास कांद्याचे भाव 200 रुपये किलोपर्यंत जाणार ?

हाती आलेल्या माहितीनुसार,  नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पांडुरणा या गावात ही घटना घडली असून. पांडुरणा शिवारात आखड्यावर गणपत निमलवाड आपल्या पत्नी आणि लहान मुला -मुलीसोबत राहत होते. त्यांची 30 वर्षीय पत्नी धूरपता निमलवाड हिने हे निर्घृण कृत्य केले आहे.

हेही वाचा : भविष्यात सुपिक शेतिकडे वळावे असे वाटत असेल तर विज्ञानाची व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक – एकदा वाचाच

2 वर्षाचा मुलगा दत्ता आणि 4 महिन्याची अनुसया या दोघांची तिने हत्या केली आणि  मंगळवारी रात्री पती झोपत असतांना मुला-मुलीला घेऊन धूरपता निमलवाड घराबाहेर पडली. गावाजवळ पुलाखाली नेऊन तिने 4 महिण्याच्या अनुसयाला मारून तिथेच पुरून टाकले. तसेच नंतर ती माहेरी ब्राह्मणवाडा इथे गेली. तिथे उसाच्या शेतात नेऊन 2 वर्षाचा मुलगा दत्ता याला देखील मारून टाकलं.

नंतर आपली आई कोंडाबाई राजेमोड आणि भाऊ माधव राजेमोड यांना परत पांडुरणा येथे आणून दोन्ही मुलाचे मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकले. भोकर पोलिसांना सूत्रांकडून ही माहिती मिळाल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी धुरपता निमलवाड हिच्यासह तिची आई आणि भावाला अटक केली.

हेही वाचा : सिद्धू मुसेवाला हत्याकांड | पोस्टमार्टम अहवालातून ‘हि’ माहिती आली समोर

दरम्यान, या महिलेनं मानसिक आजार आणि वेडसरपणातून तिने हे कृत्य केल्याचे नातेवाईक सांगतात. पण मुलगी रडत होती म्हणून तिला मारलं आणि मुलगा खायाला मागत होता म्हणून रागातून हत्या केल्याची कबुली तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही मुलांच्या हत्येप्रकरणी या महिलेवर गुन्हे दाखल केले आहे.  या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *