मुलीला वाचण्यासाठी आईने घेतली पाण्यात उडी मात्र दुर्दैवाने माय लेकीसह पाच जण पाण्यात बुडाले

पिण्याचे पाणी आणण्यासाठी व कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या मुलीचा तोल गेला आणि बुडू लागली. हे आईने बघताच पोहायला येत नसतानाही आईने मुलीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मोठी बहीण आणि आई पाण्यात बुडू लागल्याने लहान मुलीनेही उडी घेतली. त्यांना बाहेर पडता येत नाही, हे पाहून नातेवाईक असलेल्या दोघींनी उड्या मारल्या आणि पाचही जणींचा बुडाल्याने मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेत राधाबाई छोडिया आडे (४५), दीक्षा घौडिबा आडे (२१) काजल धोंडिया आडे (१९, सर्वजण रा. रामापूर तांडा, ता. पालम, जि. परभणी), सुषमा संजय राठोड (२२), अरुणा गंगाधर राठोड (२६, दोधीही रा. मोजमाबाद तांडा, ना. पालम) अशी मृत ५ जणींची नावे आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

पाचजणी तलावात बुडाल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम येथे शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

पालम तालुक्यातील अकरा ऊसतोड कामगार अहमदपूर तालुक्यातील उजना परिसरात ऊसतोडणीसाठी आले होते.
घटनास्थळी दीक्षा आडे हिचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. वाचविण्यासाठी आई राधाबाई या पाण्यात उतरल्या.तिला परंतु, त्याही बुडू लागल्या आई व बहीण बुडत असल्याचे पाहून काजलने उडी घेतली. त्या तिघी बुडत असल्याचे पाहून राधाबाईच्या भावाच्या मुली सुषमा व अरुणा यांनीही उडी घेतली. मात्र त्याही पाण्यात बुडाल्या .

आई बहीण नातेवाईक पाण्यात बुडत असल्याचे ११वर्षीय सुशांतने पाहिले आणि आरडाओरडा केला यामुळे
त्यामुळे नातेवाईकांनी धाव घेतली. परंतु पाचही जणीचा मृत्यू झाला होता.

घटनास्थळास अहमदपूरचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, सपोनि. शैलेश बंकवाड, उपनिरीक्षक राजेश जाधव व्यंकट महाके, चंदू गोखरे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *