दुबईत आज पहिल्या हिंदू मंदिराचं होणार उद्घाटन, जाणून घ्या काय आहे या मंदिराचे वैशिष्ट्य

दुबईत राहणाऱ्या हिंदू समुदायाच्या लोकांना दसऱ्याच्या अगदी आधी एक मोठी भेट मिळाली आहे. दुबई, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आजपासून म्हणजेच मंगळवारपासून पहिले हिंदू मंदिर उघडणार आहे. दुबईच्या जेबेल अली भागात असलेले नवीन हिंदू मंदिर दसरा उत्सवाच्या एक दिवस आधी मंगळवारी उघडणार असून. दुबईच्या पूजा गावात हे मंदिर बांधण्यात आले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांवर ‘सरकार’ मेहरबान, DA नंतर आणखी एक भत्ता वाढणार !

खलीज टाइम्सने वृत्त दिले आहे की, हे मंदिर सिंधी गुरू दरबार मंदिराचा विस्तार आहे, जे संयुक्त अरब अमिरातीतील सर्वात जुन्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. मंदिराची पायाभरणी फेब्रुवारी २०२० मध्ये झाली. या उद्घाटनामुळे या परिसरात प्रार्थनास्थळ असण्याचे भारतीयांचे दशकापूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

लोकांना मंदिराचे दर्शन आधीच

अधिकृत उद्घाटनापूर्वी 1 सप्टेंबर रोजी मंदिर अर्धवट उघडण्यात आले. त्यामुळे हजारो लोकांनी या मंदिराची झलक आधीच पाहिली आहे. सर्व धर्माचे लोक येथे जाऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवरात्रीच्या काळात येथे 9 दिवस विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

मोठी बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांचे वाढणार निवृत्तीचे वय आणि पेन्शन

आज मंदिरात प्रवेश मिळणार नाही

मंगळवारी उद्घाटनाचा कार्यक्रम असल्याने सर्वसामान्यांना प्रवेश मिळणार नाही. मात्र, बुधवारपासून ते सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे. वृत्तानुसार, मंदिरात देवाच्या 16 मूर्ती स्थापित आहेत. मंदिराबाबत हिंदू समाजात कमालीची उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *