नवले पुलावरील अपघाताचं नेमकं कारण समोर आलं,ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता !

Pune Navale Bridge Accident :
नवले पुलावरील अपघाताबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर समोर आली.

पुणे- बंगलोर हायवेवर (Pune Bangalore Highway) नवले पुलावर (Navale Bridge Accident) रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रकने एकाच वेळी 24 वाहनांना धडक दिली. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र तापासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर समोर आली.

5G ने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, 8 वर्षात देश किती पुढे जाईल, पाहा आकडेवारी —

अपघाताचं नेमकं कारण काय?
चालकाने उतार असल्याने इंजिन बंद केले आणि गाडी न्यूट्रलमध्ये टाकून तो चालक गाडी चालवत होता. यात मात्र वेग प्रचंड वाढला आणि नियंत्रण सुटलं. यावेळी ब्रेक न दाबता आल्याने त्याच्या ट्रकने गाड्या चिरडल्या गेल्या. या दुर्घटनेनंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. कालपासून पोलीस या चालकाचा पोलीस शोध घेत आहे. मणिराम छोटेलाल यादव असे चालकाचे नाव असून तो मध्य प्रदेशचा रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Byju’s नंतर, आता Zomato मध्ये टाळेबंदी, नोकरी जाण्याचे आहे तरी काय कारण ?

अपघातात 13 जणं गंभीर जखमी
नवले पुलाजवळ झालेल्या अपघातात 13 जणं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नवले हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, रुबी हॉल हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर, जगताप हॉस्पिटल या सगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

1) राहुल भाऊराव जाधव रा.वारजे
2) शुभम विलास डांबळे रा. सदर
3) तुषार बाळासाहेब जाधव रा. सदर
4)आनंद गोपाळ चव्हाण रा. सहयोग नगर, पुणे
5) राजेंद्र देवराम दाभाडे रा. माणिकबाग पुणे
6) साहू जुनेल रा.कोंढवा पुणे
7)ऑस्कर लोबो रा. कोंढवा पुणे
8) मधुरा संतोष कारखानीस वय 42 वर्ष रा. वनाज
9)चित्रांक संतोष कारखानीस वय 8 वर्ष
10) तनीषा संतोष कारखानीस वय 16 वर्ष
11)विदुला राहुल उतेकर वय 45 वर्ष रा. सदर
12) अनघा अजित पभुले वय 51 वर्ष रा. वडगाव पुणे
13)अनिता अरुण चौधरी वय 54 वर्ष रा. राहटणी चौक, पुणे

जागतिक दूरदर्शन दिवस: जागतिक दूरदर्शन दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास

अपघातामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण 
काही दिवसांपूर्वी पुण्यातील नवले पुलावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी आता एक नवा प्रस्ताव समोर आला होता. नवले पूल आणि त्यापासून काही अंतरावर असलेला वडगाव पूल जोडण्यासंदर्भातला प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे महापालिकेला देण्यात आला होता. या ठिकाणी अपघातांमध्ये सतत होणारी जीवितहानी लक्षात घेता या प्रस्तावाची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.

गॅस कनेक्शनसह 50 लाखांचा विमा उपलब्ध आहे आणि हा अधिकार, अधिक जाणून घ्‍या

कांद्याच्या दरात सुधारणा होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *