डॉक्टर पत्नीने पतीच्या कथित प्रेयसीला केले अश्लील मॅसेज

औरंगाबाद :- पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून डॉक्टर महिलेने तिच्या पतीच्या कथित प्रेयसीच्या नातेवाइकांना अश्लील संदेश पाठविल्याचे समोर आले आहे . विशेष म्हणजे हा गुन्हा करण्यासाठी तिने नोकराचे सिमकार्ड वापरून फेकून दिल्याचे पोलीस तपासानंतर निष्पन्न झाले.

याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सिमकार्डधारक परशुराम देवीदास वाघुले यास अटक केली आहे , तर मुख्य आरोपी डॉ. शिल्पा बोलधणे यांना नोटीस बजावली आहे.

हेही वाचा :- भाजपच्या माजी आमदार पती पत्नीविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल

पोलीस सूत्रांनी सांगितले की, तक्रारदार महिलेचा भाऊ आणि पतीला १७ मे रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून अश्लील मेसेज आले होते. त्यामुळे त्यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.

संबंधित मोबाइल सिमकार्ड आरोपी परशुराम वाघुलेच्या नावे असल्याचे समोर आले असून . पोलिसांनी अटक करून त्याची कसून चौकशी केली असता त्याने कार्ड त्याच्या नावे असले तरी या कार्डचा वापर डॉ. शिल्पा बोलधणे करीत असल्याचे सांगितले. तो डॉ. बोलधणे यांच्याकडे कामाला आहे.

हेही वाचा :- महिला पोलीस निरीक्षकासह, सहकारीही अँटी करप्शनच्या जाळ्यात

डॉ. शिल्पा बोलधणे यांना त्यांच्या पतीचे तक्रारदार महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

पोलिसांनी डॉ. शिल्पा बोलधणे यांना चौकशीसाठी बोलावून घेत त्यांचा मोबाइल जप्त केला. त्यांना कायदेशीर नोटीस बजावून सोडण्यात आले.

सरकारी नौकरी : ONGC मध्ये 3500 पेक्षा जास्त पदांसाठी रिक्त जागांची भरती, शिक्षण ITI पास या दिवसापर्यंत अर्ज करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *