मराठी चित्रपटसृष्टीचा हिरा हरपला, प्रदीप पटवर्धन यांचे निधन
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. 65 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. आपल्या आभिनयानं प्रेक्षकांना भूरळ पाडणारं आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे प्रदीप पटनवर्धन. प्रदीप पटनवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याचं स्पर्धा गाजवल्या. चित्रपट, नाटक आणि मालिका यांमधून प्रदीप हे प्रेक्षकांच्या भेटीस आले.
चित्रपटांमध्ये केलं काम
प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोळा बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), पोलिस लाईन (2016), नवरा माझा नवसाचा आणि 1234 (2016) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती.
नाटकांमध्ये काम करुन केलं प्रेक्षकांचे मनोरंजन
मोरूची मावशी या नाटकाला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, सखी प्रिय सखी, बायकोची खंत यांसारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली.