आसाराम बापूच्या ‘या’ आश्रमात सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह
तुरुंगात एक मुलीवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या आसारामच्या आश्रमात चक्क अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मयत बालिका १३ ते १४ वर्ष वयोगटातील असल्याची माहिती समोर आली असून. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे असलेल्या आसारामच्या आश्रमात मुलीचा मृतदेह सापडला आहे, त्यानंतर एकच खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी औरंगाबाच्या तरुणीचा एक वेबसाईडवर ‘कॉलगर्ल’ म्हणून फोटो आणि मोबाईल नंबर अपलोड केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना मध्यप्रदेश पोलिसांनी आरोपी छिंदवाद येथे असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी दरम्यान आसाराम बापूचा शिष्य असल्याचे त्याने सांगितले होते, तो एका आश्रमात आचार्य म्हणून काम करतो असा त्याचा दावा आहे. आता एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह देखील आसारामच्या आश्रमात सापडला आहे. दरम्यान या प्रकरणाची देखील पोलीस कसून चौकशी करत आहे.