२६/११ चा सूत्रधार दहशदवादी अजूनही जिवंत सूत्रांची माहिती

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीर याला पाकिस्तानमध्ये ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मीर हा पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबासाठी काम करत होता. साजिद मीरसह लष्कर-ए-तोयबाने आयएसआयच्या मदतीने मुंबईत हल्ले केले होते. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) मीरला ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी घोषित केले आहे.

राज्यात राजकीय गोंधळ, मुंबईत कलम १४४ लागू

मुंबईत जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मुंबईतील दहशतवाद्यांचा साजिद मीर हा कंट्रोलर होता. पाकिस्तानमध्ये बसून हा त्यांना सर्व माहिती पुरवत होता आणि घेत होता. २००१ पासून मीर हा एलईटीचा वरिष्ठ सदस्य असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थांचे मत आहे. २००६ ते २०११ या काळात त्याने गटाच्या वतीने विविध दहशतवादी हल्ल्यांची योजना आखल्या आहेत.

यंदा देशात कापूस लागवड जोमाने, एकट्या तेलंगणात 70 लाख एकरवर पेरणी ?

पाकिस्तान सरकार नेहमीच साजिद मीरबद्दल खोटे बोलत आला आहे. साजिद मीरची उपस्थिती नाकारली होती. तसेच साजिद मीरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र, आता मीर याला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. परदेशी सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा कट रचणे, दहशतवाद्यांना मदत करणे, अमेरिकेबाहेर नागरिकांची हत्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करणे या आरोपांवरून अमेरिकन एजन्सीने मीरला ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी घोषित केले आहे. मुंबई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १६६ लोकांमध्ये सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. एफबीआयने मीरची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *