आता पर्यंत ओमायक्रोनमुळे जगभरात ११५ तर भारतात फक्त १ मृत्यू, खरंच ओमेक्रोन घातक आहे का?

भारतात कोरोना २० नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे सर्व प्रथम आढळला. दक्षिण आफ्रिकेचा नागरिक 20 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे आला. त्याची विमानतळावर तपासणी करण्यात आली आणि तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, त्यानंतर त्याने हॉटेलमध्ये स्वतःला विलीगीकरणात ठेवले. दोन दिवसांनंतर, त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. त्या नमुन्यांच्या आधारे तो ओमायक्रोन व्हेरिएन्टचा रुग्ण आहे असे समजले. २० नोव्हेंबर ते आज म्हणजेच १२ जानेवारी या दरम्यान फक्त १ व्यक्ती ओमायक्रोनमुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव्ह अग्रवाल यांनी आरोग्य विभागाच्या बैठकतीत सांगितले.

 

तसेच ओमायक्रोनमुळे जगभरात फक्त ११५ मृत्यू झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ओमायक्रोनचे लक्षणे लवकर आढळतात आणि सौम्य असतात. दरम्यान भारतात ओमायक्रोन येऊन ६० ते ७० दिवसांच्यावर झाले तरी ओमायक्रोनने १ तर कोरोनाच्या जुन्या व्हेरिएन्टने जवळ जवळ तिसऱ्या लाटेत २५० हुन अधिक मृत्यू झाले आहे. कोरोनामुळे जनजीवन गेल्या २ वर्षांपासून विस्कळीत झाले आहे. शाळा, महाविद्यालय देखील बंद आहे. तसेच सणांचा आनंद देखील जनतेला घेता आलेला नाही. दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत या नवीन व्हेरिएन्टची भीती देखील जनतेच्या मनात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *