हसणारा साप आणि नाचणारे पेंग्विन
कॉमेडी वाईल्डलाईफ!
आजच्या तणावपूर्ण जगात विनोद दुर्मिळ होत चालला आहे. यामुळेच कुठेही विनोद दिसला की, संवेदक्षम माणसं तो टिपतात आणि मग ते क्षण जगासमोरही आणतात. अशाच प्रयत्नातून दरवर्षी कॉमेडी वाईल्डलाईफ फोटोग्राफी अवॉर्ड दिला जातो.गेल्या सहा वर्षांपासून हा अवार्ड दिला जातो. २०१५ पासून हा अवॉर्ड जगभरात प्रसिद्ध झाला आहे.या अवॉर्डचा हेतू निसर्गातील प्राण्यांचा विनोदी पैलू लोकांसमोर आणणे. २०२१ मध्ये जगभरातून ७००० लोकांच्या इंट्रीज आल्या होत्या.अंतिम फेरीतले स्पर्धक घोषित झाले आहेत.बघुयात यातील सर्वोत्तम फोटोज.
1)दीर्क जंन स्टीहोवर – या फोटोमध्ये एका माकडाने झाडावर एक काठी हातात पकडली आहे त्याचवेळेस एक जिराफ त्या झाडाच्या मागे उभा राहिला. त्यामुळे फोटोमध्ये असे दिसत आहे की माकड जिराफवर बसलेला आहे.
2) मार्टिना नोवोटना – गालात हसणारा सील
या फोटोमध्ये ग्रे रंगाचा सील प्राणी गालातल्या गालात हसताना दिसत आहे.मार्टिना नोवोटना यांनी म्हटले आहे की या फोटो साठी त्यांना तासन्तास खडक असलेल्या बीच वर बसावे लागले.
3)सरोष लोधी – या फोटोमध्ये एक माकड नाचताना दिसत आहे. हा फोटो भारतातील ताडोबा अंधारी टायगर रिसर्व्ह मध्ये काढला आहे.
4)जोशूआ गालीकि – नाचणारे पेंग्विन
या फोटोमध्ये तीन पेंग्विन नाचत असल्याचे दिसत आहे. हा फोटो जोशूआ गालीकि यांनी फाल्कलँडमध्ये काढला आहे.
5) आदित्य शिरसागर – हसणारा साप
हा वाईन सापाचा फोटो भारतातील पश्चिम घाटात घेतलेला आहे. जवळ गेल्यावर हा साप पटकन तोंड उघडतो पण या फोटोमध्ये तो साप हसत असल्याचा भास होत आहे.
6 ) एडवीन स्मिथ्स -हसणारा घोडा
एडमिन स्मिथ्स म्हणाले आहेत की त्यांनी हा फोटो काढण्यासाठी दोन वर्ष दोन घोड्यांना भेट दिली. एखाद्या सेल्फी कॅमेरा मध्ये पोज देतात तसे या घोड्यांनी पोज दिली आहे.