वाहन उद्योग “चार्ज” होतोय १०० कि.मी. ला लागतील फक्त २० रुपये ?

इलेक्ट्रिक वाहनांना आता चार्जिंग पॉईंट मिळायला सुरुवात झाली आहे, कारण पेट्रोल – डिझेलचे दर भरारी घेत आहेत, दुसरीकडे केंद्र राज्य सरकारे इ- वाहनांना प्रोत्साहन देतेय. केंद्राची तर योजना आहे की, २०३० पर्यंत इंधनामध्ये साडेतीन लाख कोटी रुपये वाचवायचे आणि कारबन उत्सर्जनात किमान ३५ टक्के बचत करायची. यामुळे आता बाईक-कार्स इंधनाचा ‘इ’ अधिक ठळकपणे गिरवताना दिसतील. यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांचे एक नवीन युग अवतरण्यास सुरुवात झाली आहे.
इलेक्ट्रिक बाइक इलेक्ट्रिसिटीवर चालते, त्याच्यात एक बॅटरी असते त्यावर इलेक्ट्रिक बाइकची मोटर चालते.जेव्हापासून पेट्रोलच्या किंमतीने शंभरचा आकडा पार केला आहे इलेक्ट्रिक बाइकची मागणी देशभरात वाढत आहे.
पेट्रोल बाईक आणि इलेक्ट्रिक बाइकमधला फरक :
पेट्रोल बाईक चा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे वायू प्रदूषण.इलेक्ट्रिक बाईकची किंमत पेट्रोल बाईकपेक्षा जास्त आहे. इलेक्ट्रिक बाइक महाग असण्याचे कारण म्हणजे त्यातील बॅटरी. इलेक्ट्रिक बाईक ची किंमत पेट्रोल बाईकपेक्षा जास्त असली तरी पेट्रोलच्या किमती सोबत आपण जर तुलना केली तर इलेक्ट्रिक बाइक स्वस्त दिसते. इलेक्ट्रिक बाइकची रनिंग किंमत पेट्रोल बाइकपेक्षा कमी आहे. पेट्रोल बाईक मध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पाच ते दहा मिनिटं लागतात इलेक्ट्रिक बाइक पूर्णपणे चार्जे करण्यासाठी ६-७ तास लागतात फास्ट चार्जिंग बॅटरी असली तर एक तास लागतो. जास्त प्रवासासाठी इलेक्ट्रिक बाइक चा वापर करणे अवघड आहे कारण पूर्णपणे चार्जे झालेली इलेक्ट्रिक बाइक जास्तीत जास्त १५० ते २०० कि. मी. पर्यंत चालते.

इंधन मूल्यात इतकी बचत :
पूर्ण चार्ज झालेली इलेक्ट्रिक बाइक १०० ते १२० किलोमीटर चालते. इलेक्ट्रिसिटीची किंमत प्रति युनिट २ रुपये ते ५ रुपये आहे. इलेक्ट्रिक बाईकला पूर्णपणे चार्ज व्हायला ४ युनिट इलेक्ट्रिसिटी लागते तर पूर्ण खर्च जास्तीत जास्त २० रुपये येतो.म्हणजेच १ कि. मी. = १०-१६ पैसे. तसेच पेट्रोल बाईकला ४० -५० km मध्ये ९०-१०० रुपये लागतात \. पेट्रोल बाईक पेक्षा इलेक्ट्रिक बाइकची मेन्टेनन्स कॉस्ट कमी असते पेट्रोल बाईकचे २००० मुव्हिंग पार्टस असतात आणि इलेक्ट्रिक बाइक चे २० ते २५ मुव्हिंग पार्टस असतात त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक ची मेंटेनन्स किंमत पेट्रोल बाईक पेक्षा कमी असते.

युनियन बजेट २०१९-२० मध्ये केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये फायदा मिळणार असल्याची घोषणा केली होती.राजस्थान सरकारने घोषित केले आहे कि इलेक्ट्रिक बाइकचा टॅक्स कमी करून त्यावर सबसिडी देणार आहे.भारतातील १३ राज्यांमध्ये EV (इलेक्ट्रिक व्हेईकल )पॉलिसी मंजूर केली आहे.आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटका,केरला,मध्य प्रदेश,महाराष्ट्र,तमिळनाडू, तेलंगणा,उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मेघालय, गुजरात, आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये EV पॉलिसी मंजूर केली आहे.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) पॉलिसी २०२१ –

राज्य सरकारने घोषित केले आहे कि इलेक्ट्रिक वाहनांना मार्च २०२५ पर्यंत रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फी लागणार नाही. सरकारी कार्यालयात इलेक्ट्रिक बाइक पार्किंग स्पेस असणे अनिवार्य आहे. इलेक्ट्रिक बाइक मध्ये लिथियम आयन बॅटरीज बनवण्याची कमीत कमी एक उत्पादन सुविधा असेल
महाराष्ट्र EV पॉलिसीमध्ये २०२५ पर्यंत मेट्रोपॉलिटन शहरात चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील.
मुंबईमध्ये १५०० , पुण्यामध्ये ५००,नागपूर मध्ये १५०, नाशिक मध्ये १०० औरंगाबाद मध्ये ७५ अमरावतीत ३० आणि सोलापूर मध्ये २० इलेक्ट्रिक बाइक चार्जिंग स्टेशन्स असतील.महाराष्ट्र २०२५ पर्यंत मुंबई औरंगाबाद पुणे नागपूर आणि नाशिक मध्ये २५ टक्के सार्वजनिक वाहतूक सुविधा असेल
२०२५ पर्यंत नवीन वाहनांच्या रजिस्ट्रेशनमध्ये १० % योगदान इलेक्ट्रिक वाहनांचे असेल.
एप्रिल २०२२ पासून सगळ्या नव्या सरकारी गाड्या इलेक्ट्रिक असतील.२०२५ पर्यंत एकूण दु चाकीच्या १० टक्के, तीन चाकीच्या २० टक्के चे लक्ष्य आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या बाबतीत इलेक्ट्रिफिकेशन लक्ष्य २५ टक्के निश्चित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *