सिद्धू मुसेवाला हत्याकांड | पोस्टमार्टम अहवालातून ‘हि’ माहिती आली समोर
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची रविवारी 29 मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली, पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हि हत्या झाली. मुसा गावामध्ये मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून. आता त्यांच्या पोस्टमार्टम अहवालातून त्यांच्या मृत्यू संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहे. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 गोळ्यांच्या जखमा असल्याचं समोर आलं. तसेच जखमी झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात उघड झाले. पोस्टमार्टम अहवाला नुसार, सिद्धू मुसेवाला यांच्या शरीरावर 23 जखमांच्या खुणा होत्या. किडनी, यकृत, पाठीचा कणा या ठिकाणी गेळ्या लागल्या होत्या. 14 ते 15 गोळ्या शरीराच्या पुढच्या भागावर लागल्या होत्या. तसेच तीन ते चार गोळ्या त्यांच्या उजव्या हाताच्या कोपरावर लागल्या. त्यांच्या शरीरावर तीन ते पाच सेंमीपर्यंतच्या जखमा आढळल्या आहे.
हेही वाचा : राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी, मविआची भाजपला ‘हि’ ऑफर
मानसा जिल्ह्यात रविवारी शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला आहे. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी कुख्यात गुंड गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोईनं गेंगने स्वीकारली आहे.
हेही वाचा : भविष्यात सुपिक शेतिकडे वळावे असे वाटत असेल तर विज्ञानाची व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक – एकदा वाचाच
या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे, अनेक प्रश्न देखील या प्रकरणावर उपस्थित केले जात आहे, हत्येच्या एक दिवसा आधी त्याची सुरक्षा पंजाब सरकारने कमी केली होती, तसेच या प्रकरणात सिद्धू मुसेवाला यांच्या निकटवर्तीयांचा देखील हात असल्याची शक्याता पोलीस वर्तवत आहे.