भाजपचे आजारी आमदार मतदानासाठी ‘पीपीई किट’ घालून विधान भवनात
आज राज्यसभेची सहा जागांसाठी निवडणूक आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये लढत रंगताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक मत दोनी पक्षांसाठी महत्वाचे आहे. अशात गंभीर आजारी असलेले पिंपरी चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप पीपीई किट घालून विधान भवनात मतदान करण्यासाठी गेले. मत वाया जाऊ नये यासाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न आहेत. तसेच प्रयत्न भाजपानेदेखील केले आहेत. भाजपाचे एक आमदार आज रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल झाले. लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही राज्यसभा निवडणूक मतदान प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. आजारी असल्याने ते मतदानाला येणार नाहीत, असा कयास बांधला जात होता, मात्र अखेर त्यांनी मतदानप्रक्रियेत भाग घेतला.
हेही वाचा :
- संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे इंदापूरातील ठिकाण बदलले, ‘हे’ असेल नवीन ठिकाण
- माती मधील भुरटा चोर
भाजपचे पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या काही महिन्यात पासून गंभीर आजाराने त्रस्त आहे. तब्बल ९० दिवस ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते. नुखतीच काही दिवसांपूर्वी त्यांना सुट्टी मिळाली, त्यातच राज्यसभेच्या निवडणुका लागल्या अशात जगताप मतदान करणार का? हा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र त्यांना रूगहनवाहिकेतून मुंबईत आणले गेले आणि ते या निवडणुकीत सहभागी झाले.
दरम्यान, त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरु आहे. त्याच्या सोबत डॉक्टरांची टीम सुद्धा आहे अशी माहिती मुळात आहे. तसेच त्यांना पीपीई किट घालून विधान भवन आणल्या गेले आहे.