सलग पाचव्या दिवशी 600 अंकांनी घसरला सेन्सेक्स

आज निफ्टी 9 अंकांच्या घसरणीसह 17007 च्या पातळीवर बंद झाला आणि सेन्सेक्स 38 अंकांनी घसरून 57108 च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये आज वरच्या पातळीवरून 597 अंकांची घसरण झाली आहे.

ही घसरण थांबेल अशी जी आशा आज शेअर बाजारात दिसत होती, तीही व्यवहाराच्या अखेरीस संपुष्टात आली. अस्थिरतेच्या दरम्यान, शेअर बाजार आज व्यवहाराच्या शेवटी पुन्हा एकदा लाल चिन्हात बंद झाला . दुसरीकडे, निफ्टीने मोठ्या कष्टाने 17 हजारांची पातळी वाचवण्यात यश मिळविले. बाजारात एकीकडे बँका, वाहन आणि वित्तीय क्षेत्र तोट्यात राहिले, तर दुसरीकडे आयटी आणि एफएमसीजीमधील खरेदीमुळे तोटा मर्यादित राहिला. आज बाजारात आणखी तोटा दिसला असता, पण रिलायन्स आणि टीसीएसच्या नफ्यामुळे परिस्थिती निवळली.

राज्यात पावसामुळे कापूस पिकाचे मोठं नुकसान,अतिवृष्टीमुळे 27 लाख शेतकरी संकटात

ही घसरण थांबेल अशी जी आशा आज शेअर बाजारात दिसत होती, तीही व्यवहाराच्या अखेरीस संपुष्टात आली. अस्थिरतेच्या दरम्यान, शेअर बाजार आज व्यवहाराच्या शेवटी पुन्हा एकदा लाल चिन्हात बंद झाला . दुसरीकडे, निफ्टीने मोठ्या कष्टाने 17 हजारांची पातळी वाचवण्यात यश मिळविले. बाजारात एकीकडे बँका, वाहन आणि वित्तीय क्षेत्र तोट्यात राहिले, तर दुसरीकडे आयटी आणि एफएमसीजीमधील खरेदीमुळे तोटा मर्यादित राहिला. आज बाजारात आणखी तोटा दिसला असता, पण रिलायन्स आणि टीसीएसच्या नफ्यामुळे परिस्थिती निवळली.

आज कुठे कमावले आणि कुठे तोटा

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेले 18 समभाग वाढीसह बंद झाले आहेत. इंडसइंड बँक 2.18 टक्के, पॉवरग्रीड 1.81 टक्के, डॉ. रेड्डीज 1.29 टक्के वाढून बंद झाले. दुसरीकडे, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या हेवीवेट समभागांमध्ये सुमारे 0.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, टाटा स्टील आज 2.25 टक्क्यांनी घसरला आहे. टायटन, एसबीआय, कोटकबँक, टेक महिंद्रा आज एक टक्‍क्‍यांहून अधिक तुटले आहेत. निफ्टीवर सुमारे एक टक्क्यांची सर्वात मोठी वाढ आयटी क्षेत्रात नोंदवली गेली. दुसरीकडे, वित्तीय सेवा क्षेत्र 0.8 टक्क्यांनी घसरले आहे.

रशियात ‘प्लेन’चे एक ‘तिकीट’ २२ लाखांच्यावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *