राजकारण

भाजपच्या माफियाचा पर्दाफाश करणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल

Share Now

ईडीची धमकी देऊन बँकॉक, थायलंडमध्ये वसुलीचे पैसे जमा करण्यात आल्याची माहिती असून भाजप पुरस्कृत माफिया टोळीचा पर्दाफाश करणार असल्याचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले लवकर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमय्या यांनी किती पैसे जमा केले, त्याचा वापर कसा केला हा पोलीस तपासाचा भाग आहे. हा तपास पोलीस करतील असेही त्यांनी म्हटले. सोमय्यांवरील आरोप हे राजकीय सूडाने केले नसून हे आरोप स्पष्ट असल्याचेही राऊत यांनी म्हटले. मनात भीती नसेल तर सोमय्यांनी पोलिसांसमोर हजर राहावे असा टोलाही राऊत यांनी लगावला. आयएनएस विक्रांतचे प्रकरण राजकीय नाही. एका निवृत्त सैन्य अधिकाराने तक्रार दाखल केली त्यानंतर कारवाई सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेल्या निधीबाबत सोमय्यांनी फक्त अकरा हजार रुपये जमा झाल्याचे म्हटले होते. त्यावर राऊत यांनी म्हटले की, एक रुपया असो वा हजार, चोरी ही चोरी आहे. जर सोमय्यांनी काही चुकीचे केले नसेल तर त्यांनी पोलिसांसमोर हजर राहावे असेही त्यांनी म्हटले.

किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही अनेक घोटाळे समोर आणतात मग आता का पळताय, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपचे या प्रकरणातून वस्त्रहरण झाले असल्याचे राऊत यांनी म्हटले. भाजप पुरस्कृत माफिया टोळीची इतर प्रकरणे समोर आणणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. ईडीची धमकी देऊन बँकॉकमध्ये पैसे जमा करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *