तळ घरात सापडले ५०० चाव्यांचा गुच्छा २५७ कोटींचा खजिना .. असा झाला खुलासा

“समाजवादी” अत्तरच्या व्यापाऱ्याकडून आतापर्यंत २५७ कोटी जप्त

परफ्यूम व्यावसायिक पियुष जैन याला अटक करण्यात आली आहे. पियुष जैन यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर अधिकारी देखील चकित झाले, कारण सुरवातीलाच १५० कोटी रुपये एवढी रोख रक्कम त्याच्याकडे होती. जीएसटी इंटेलिजन्सने कनौज येथून व्यावसायिकाला अटक केली आहे. पीयूष जैन यांच्याकडून २५७ कोटी रुपये रोख मिळाले. त्याच्या घरावर छापा टाकला असता एका बॅगेत ३०० चाव्या सापडल्या. त्याचवेळी पियुषकडून ३०० कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. तसेच मुंबई आणि दुबईमध्ये मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.

यापूर्वी पियुष जैन यांच्या घरावर मॅरेथॉन धाड टाकण्यात आली होती. अनेक खुलासे झाले आहेत. छाप्यादरम्यान व्यापारी पियुष जैन यांच्या घरातून बॅगेत ३०० चाव्या सापडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पियुष जैन यांनी एकाच कॅम्पसमध्ये चार घरे बांधली असून एक तळघरही आहे, आता हे तळघर उघडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पियुष जैनच्या छाप्यात आतापर्यंत २५७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

कन्नौजमधील परफ्युम व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर आयकर आणि जीएसटी गुप्तचर विभागाचे छापे सुरू आहेत. कानपूरमधून १७७ कोटींच्या जप्तीनंतर आता सर्वांच्या नजरा कन्नौजच्या घराकडे लागल्या आहेत की इथून नोटांचा किती मोठा खजिना बाहेर येणार आहे. कन्नौजमधील घरातून काय सापडले आहे, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. कनौजमधील जैन स्ट्रीट परिसरातील अरुंद गल्ल्यांमध्ये व्यापारी पियुष जैन यांचे घर बांधले आहे. त्यातच जीएसटी आणि आयकर विभागाचे छापे अद्याप थांबलेले नाहीत.
सर्वात मोठी बातमी म्हणजे १७७ कोटींच्या नोटा मिळाल्यानंतरही हा छापा आणखी २-३ दिवस चालणार आहे. तरीही घराचे एक गेट सोडले तर इतर सर्व दरवाजे बंद आहेत. CGST कायदा २०१७ च्या कलम ६७ चा उल्लेख करणारी प्रत्येक गेटवर सीलबंद नोटीस चिकटवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *