सलमानचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन पनवेलच्या फार्महाऊस वर.?

अभिनेता सलमान खानला सापानं दंश केलाय. पनवेलच्या फार्महाऊस मधली ही खळबळजनक घटना आहे. यानंतर त्याला मध्यरात्री वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुंबईच्या MGM रुग्णालयात त्याला दाखल होता. दरम्यान सलमान खानला आता त्याला घरी सोडण्यात आलंय.
ख्रिसमस तसंच वाढदिवसानिमित्त सलमान खान त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांसह पनवेल इथल्या फार्महाऊसला काल आला होता.
मध्यरात्री बाहेर पडल्यानंतर हा प्रकार घडला. सुदैवाने साप बिनविषारी होता, त्यामुळे मोठं संकट टळलं. या प्रकारानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जातं आहे.

सलमान खान ५६ वर्षांचा होणार आहे. २७ डिसेंबर रोजी तो आपला ५६ वा वाढदिवस साजरा करणार आहे. कोरोनामुळे सलमान यावेळी फार जोरात वाढदिवस साजरा करणार नाही. सलमान खान त्याचा वाढदिवस पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करणार आहे. कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र या पार्टीत सहभागी होणार आहेत. प्रत्येक वेळी सलमान खानच्या वाढदिवसाला पाहुण्यांची यादी खूप मोठी असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सलमान आपला वाढदिवस साधेपणानं साजरा करतोय.

सलमान खान चांगल्या वाईट गोष्टींनी चर्चेत असतो, बीइंग ह्युमन फाउंडेशनशी तो जोडलेलाल असून यामाध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो. यामध्ये – अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च , गरजू लोकांचा हॉस्पिटल चा खर्च, असे बरेच उपक्रम राबवले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *