धनंजय मुडेंवर बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मा आंतराष्ट्रीय हनी ट्रॅप रॅकेटचा भाग?
मंत्री धनंजय मुंडे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच, पोलिसांनी तिच्या जप्त केलेल्या मोबाइलमधून अनेक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
हेही वाचा : वैज्ञानिक पद्धतिने करा शेळीपालन शेतकर्यांसाठी कमाईचा एक चांगला मार्ग बनू शकतो,जाणून घ्या कसा
मुंडे यांच्यावर दबाव आणण्यासाठी रेणू शर्माने राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाही संदेश पाठवल्याचे दिसून आले. या नेत्यांकडूनही पैशांची मागणी झाली आहे का ? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी वाढत्या पेट्रोल दारावर दिले स्पष्टीकरण, फोडले राज्यसरकारवर खापर
पुढे हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष २ कडे वर्ग करण्यात आला. शर्मा हिच्यावर पाच कोटी रुपयांसह महागड्या गिफ्टची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानुसार मध्य प्रदेश येथून तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
या दरम्यान पोलिसांनी तिच्याकडून मोबाइल तसेच काही कागदपत्रे जमा केली. तिने अशाच प्रकारे हनी ट्रॅपद्वारे आणखीन एकाकडून पैसे उकळल्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार आली आहे. तसेच ती आंतराष्ट्रीय हनी ट्रॅप रॅकेटचा भाग असल्याचा संशय सरकारी वकिलांनी न्यायालयात वर्तवला होता.