महाराष्ट्र

राज्यातील आणखी एका सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई ; ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यासही मनाई

Share Now

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, आता ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यासही मनाई केली आहे. त्यामुळे या बँकेतील खातेधारकाच्या अडचणीत वाढ झाली आहे. मागील काही वर्षांपासून बँक आर्थिक संकटात आहे. कोल्हापूर येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडवर हे निर्बंध लागू केले आहेत.

शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी या बँकेतील 99.88 टक्के खातेधारक हे Deposit Insurance and Credit Guarantee Corporation विमा योजनेतंर्गत आहेत. या योजनेनुसार, खातेदारांना 5 लाख रुपयांच्या विम्याचे कवच आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीप्रमाणे 13 मे 2022 पासून बँकेवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध सहा महिन्यापर्यंत लागू असणार आहे.

तसेच बँकेच्या कामकाजावरही रिझर्व्ह बँक देखरेख ठेवणार असून रिझर्व्ह बँकेने सांगितले की, बँकेत लिक्विडीटी ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बँकेतून पैसे काढण्यावर ग्राहकांना मनाई करण्यात आली आहे.

बँक बंद होणार. ?

या कारवाइमुळे या बँकेतील खातेधारक चिंतेत आहे यावर रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिलं आहे. बँकेवर ही कारवाई म्हणजे बँक बंद होणार आहे, असे समजू नये असेही . या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली नाही. त्याशिवाय, कोणत्याही प्रकारच्या कर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे.

DICGC म्हणजे काय?

Deposit Insurance and Credit Guarantee Corporation नुसार ग्राहकांच्या बँकेत जमा असलेल्या रकमेवर ग्राहकांना विमा संरक्षण मिळते.
विमा संरक्षण अधिकाधिक 5 लाख रुपयांपर्यंत मिळते. या विम्यामुळे बँक बुडाली तरी ग्राहकांना कमाल 5 लाख रुपये मिळू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *