राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. पंतप्रधानांना आज राष्ट्रपतींनी बोलावून त्यांच्या कडून बुधवारच्या घटनेबद्दल जाणून घेतले. बुधवारी पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या ताफ्याला आंदोलकांनी अडवले आणि यानंतर मोदी यांनी आपल्या सुरक्षेबाबत आणि पंजाब सरकारच्या व्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण केले होते. मी जिवंत परतलोय याबद्दल पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा असेही त्यांनी म्हटले होते. हा संपूर्ण घटनाक्रम राष्ट्रपती यांनी जाणून घेतला आणि या गंभीर प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *