हि सभा असणार ‘लावरे तो व्हिडीओ भाग २’, काही वेळात राज ठाकरेंच भाषण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे येथे उत्तरसभा होणार आहे .आठवडा भरापूर्वी मुंबई येथील सभेत राज ठाकरे यांनी मशीद ,मदरसे , भोंगे बाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या .या टीकेला आजच्या सभेत राज ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

या सभेसाठी डोंबिवलीतून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. डोंबिवली मनसे कार्यलयातून वाजत गाजत मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी डोंबिवलीहून ठाण्याला लोकलने रवाना झाले आहेत. तसेच सभेच्या काही दिवसापूर्वी या सभेच्या मूळ मुद्द्याबदल्ला टिझर देखील सोशल मीडियाला टाकला गेला होता, ‘लावरे तो व्हिडीओ’ या फॉर्मेट मध्ये हि सभा होणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *