डॉ. भागवत कराडांच्या मुलाच्या लग्नाच्या रिशेप्शनचे आमंत्रण राज ठाकरेंना
राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादला जाणार ; जाणून घ्या आजचा दौरा, अनेक ठिकाणी जंगी स्वागत होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा आज पुणे ते औरंगाबाद दौराही चर्चेत आहे. या दरम्यान केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मुलाच्या रिशेप्शनचे आमंत्रण राज ठाकरे, अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना देण्यात आले आहे.
हेही वाचा : आधार लिंक: जन धन खाते आणि आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करा, तुम्हाला 1.3 लाखांचा लाभ मिळेल!
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे-भाजप युतीचे संकेत दिसत असताना, भाजपच्या मराठवाड्यातील दिग्गज मानले जारणारे नेते भागवत कराड यांच्या मुलाच्या रिशेप्शनचे आमंत्रण राज ठाकरेंना दिल्याने या चर्चेला आणखीन उधाण येते का? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा : जॅकलिन फर्नांडिसची ७.२७ कोटीची संप्पती ईडीने केली जप्त, कारण ऐकून व्हाल थक्क
दरम्यान, राज ठाकरे काल पुण्यात दाखल झाले होते, आज सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांनी या दौऱ्याची आखणी करण्यात आलीय. आणि औरंगाबादच्या सभेआधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं केला आहे. पुणे ते औरंगाबाद प्रवासात राज ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागतही केलं जाणार आहे. अहमदनगरमध्ये ‘जय श्रीराम’ अश्या घोषणा देत राज ठाकरेंवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.