प्रकाश आमटेंचे हॉस्पिटल मधील फोटो आले समोर, प्रकृती बद्दल महत्वाची माहिती

समाजसेवक प्रकाश आंमटेंची प्रकृती सुधारत असल्याचंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रकाश आमटेंना कॅन्सर झाल्याचं कळताच अनेकांनी त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली. दरम्यान 4 दिवसांनी प्रकाश आमटेंचा रुग्णालयातील एक फोटो समोर आला आहे. त्यांचा मुलगा अनिकेत आमटे याने वडिलांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे.

बदामाची शेती : 50 वर्षे मोठी कमाई करून देणारी बदामाचे झाडे अशा प्रकारे लावा,अंतर्गत भाजीपाला ही पिकवा

सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. 2-3 दिवसांनी चेक अप होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड values ठीक असल्यास लवकरच (8-10 दिवसात) किमो थेरपी सुरू करतील, असं त्यांच्या मुलाने सांगितलं आहे. डॉक्टर प्रकाश आमटे हे 8 जून रोजी पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले असता त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत व पूर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे, असं अनिकेत आमटे म्हणालेत.

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी ४००० हून अधिक कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या वाढली

प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे पुत्र आहेत. डिसेंबर 1973 पासून ते पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात. लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *