भारत पोलियोमुक्त झाला तसा कोव्हीडमुक्त होणार का ?

१६ मार्च १९५५ रोजी पहिली पोलिओ लस दिली गेली होती लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा दिवस साजरा करतात. १६ मार्च ला करोडो मुलांचे पोलिओ लसीकरण केले जाते. 1955 पासून भारत सरकारने पोलिओ लसीकरण योजना सुरू केली ज्यात पाच वर्षाखालील सगळ्या मुलांना पोलिओ लस दिली जाते. पल्स पोलिओ लसीकरणाचे काही उद्दिष्टे होती. देशातल्या एकाही बाळाने लस घ्यायचे चुकू नये. ज्या ठिकाणी पोलिओ नाहीसा झाला आहे तिथे तो परत येऊ नये याची काळजी घेणे. देशभरात पोलिओ लसीकरण बूथ उभारणे. दरवर्षी १६ मार्चला देशभरातल्या पाच वर्षाखालील मुलांना पोलिओ लसीकरण दिले जाते.दोन प्रकारच्या पोलिओ लस आहेत IPV आणि opv यातील opv लॉस दरवर्षी मुलांना दिली गेले. टीव्ही,वृत्तपत्र,जाहिरात या माध्यमातून या योजनेची लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
पल्स पोलिओ आजाराचे देशातून पूर्णपणे निर्मूलन होऊन हा देश पोलिओमुक्त व्हावा या उद्देशांनी सरकारने पोलिओ मुक्त अभियान सुरू केले. लसीकरण हा घातक आजारांवर मात करण्यासाठी स सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे सरकार कडून पोलिओ लस निशुल्क करण्यात आली होती. अमिताभ बच्चन यांची ची ‘दो बूँद जिंदगी के’ ही जाहिरात कधीकाळी खूप गाजली होती.पोलिओ निर्मूलन करणे हे खूप मोठे आव्हान होते.देशाची लोकसंख्या, हवामान, गरीबी आणि त्यामुळे उद्भवणारी कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती हे अडथळे पार पाडणे कठीण काम होते. पण तरीही २००९ पर्यंत देशातील ६० टक्के पोलिओ केसेस नाहीशा झाल्या, संपुष्टात आल्या. २०११ पासून एकही पोलिओ केस देशात सापडला नाही. शेवटची पोलिओ केस १३ जानेवारी २०११ मध्ये गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये आढळली. २०१४ मध्ये भारताला अधिकृतपणे पोलिओमुक्त घोषित करण्यात आले. WHO ने दिलेल्या अहवालानुसार भारताचे नाव जगभरातील ११ पोलिओमुक्त देशांमध्ये सामील करण्यात आले सध्या आपला देशच नाही तर अख्खे जग कोरोना व्हायरसशी लढत आहे. भारत जसा पोलिओमुक्त झाला तसाच कोरोना मुक्त होईल का ? हा प्रश्नच आता सगळ्यांच्या मनात आहे. लसीकरण आणि पुढील वर्षभर काळजी घेण्यातून हे साध्य होईल असे आरोग्य विषयक अभ्यासक मानतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *