राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात इंडियन बार असोसिएशनतर्फे याचिका दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इंडियन बार असोसिएशनतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेत भाजपा नेते नारायण राणे तसेच गणेश नाईक यांच्याविरोधात पदाचा गैरवापर करत कारवाई करण्याचा आदेश दिल्याचा दावा इंडियन बार असोसिएशनने याचिकेत केला आहे.
हेही वाचा :- १०० पुरोहितांनी दिला मंत्रोउच्चरासह राज ठाकरेंना ‘ यशस्वी व्हा ‘ असा आशीर्वाद
रुपाली चाकणकरांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी अशी मागणी करण्यात आली, काही दिवसापूर्वी भाजप नेते नारायण राणे याच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती, तसेच गणेश नाईक याच्या विरोधात महिलेने तक्रार दिली आहे यामध्ये रुपाली चाकणकर सूड बुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप आहे.
भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच आमदार नितेश राणे यांच्या विरोधात दिशा सालियानची बदनामी केल्याचा आरोप सालियन कुटूंबियांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार देखील दिली आहे. दिशा सालियानच्या आई वडिलांनी मुलीची बदनामी थांबविण्याचे आवाहन देखील केले होते. त्यानंतर राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप एका महिलेने केला होता. १९९३ पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष देत, लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याबाबतची माहिती राज्य महिला आयोगाने आपल्या ट्विटर हँडलवरून १३ एप्रिलला दिली होती. दरम्यान, अशा प्रकरणांत रुपाली चाकणकरांची भूमिका राजकीय असल्याचे बार असोसिएशनचे म्हणणे आहे.
हे ही वाचा (Read This) पशुसंवर्धन: उन्हाळ्यात प्राण्याला संसर्ग झाला आहे का ? ते असे तपासा