एक नाही तर चार लग्न करून पैसे वसूल करणारी महिला, पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : पुरुष साथीदारासह अनेक मुलांशी लग्न करून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या एका महिलेला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. भाविका मनवानी उर्फ मेघानी दिलीप तिजारे (३५) आणि तिचा प्रियकर मयूर राजू मोटघरे (२७, रा. वर्धा) अशी आरोपींची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा :- मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा राग ; जन्मदात्या माय बापाने केला मुलीचा खून
बनावट तक्रार दाखल करून मोठी रक्कम गोळा करण्याची योजना होती, अधिकाऱ्याने सांगितले. “महिलेचे 2003, 2013, 2016 आणि 2021 मध्ये लग्न झाले होते. पतीविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करणे आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळणे ही या महिलेची पद्धत होती.
जरिपटका येथील महेंद्र वनवानी यांच्या तक्रारीवरून महिलेला अटक करण्यात आली आहे, ज्याच्याशी तिने गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी लग्न केले होते. महिलेने वनवानी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता आणित्याच्याकडून ४ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा :- राज ठाकरेनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ ट्विट ; करत केली मुख्यमंत्र्यांवर टीका
गेल्या वर्षी दिल्लीतही असाच प्रकार घडला होता. यूएईच्या फुजैराहमध्ये एका पत्नीला पतीची फसवणूक करणे महागात पडले आहे. पतीला अनेक दिवसांपासून पत्नीवर संशय होता. पत्नीचे भाव पूर्णपणे बदलले होते. यामुळे पती पत्नीवर लक्ष ठेवू लागला. एके दिवशी पत्नीचा पाठलाग केल्यानंतर त्याला समजले की त्याच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध आहे.
या संदर्भात पतीने पत्नीविरुद्ध पुरावेही गोळा केले. यानंतर पतीने आणखी एक गुन्हा दाखल करून सांगितले की, पत्नीच्या या कृत्याचा त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. यामुळे पतीने पत्नीकडे मानसिक नुकसान भरपाईची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि त्यावर सुनावणी करताना पत्नीने पतीला मानसिक हानी आणि नुकसान म्हणून १० लाख २८ हजार रुपये दंड भरावा, असा आदेश देण्यात आला.
हे ही वाचा (Read This) summer special : उष्मघातापासून संरक्षण करणारे कैरीचे आरोग्यदायी पन्हे