लग्नाचा वाढदिवस नाही पश्चाताप दिनाची सुट्टी द्या, पोलीस अमलदाराचा विनंती अर्ज 

अमरावती : जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या नावाप्रमाणे विनोदी सुट्टी अर्ज ठाणेदार मंगरूळ यांना दिला. विनोद राठोड असं या पोलीस अमलदाराचं नाव आहे. २९ मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे २७ मार्चची साप्ताहिक रजा २९ मार्चला बदली करून द्यावी, अशी विनंती त्यांनी अर्जात केली आहे. सुट्टीच कारण म्हणजे सुट्टीसाठी हव्या असलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कारणासमोर कंसात पश्चाताप दिन असा उल्लेख केला. अर्जाची ही प्रत सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होतंय. पोलीस दलासह सर्वत्र या विनंती अर्जाची चर्चा होत आहे.

                पहा हा अर्ज  

सरकारी नोकरीत असलेलं कर्मचारी हे आपल्या विविध कामासाठी वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे सुटीचा अर्ज करतात. सुटी नेमकी कशासाठी हवी आहे हे देखील ते आपल्या अर्जात नमूद करत असतात. अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत एका पोलीस अंमलदाराने सुटीसाठी वरिष्ठाकडे केलेला अर्ज मात्र चर्चेचा विषय ठरू लागला आहे. कारण वार्षिक कॅलेंडरमध्ये नसलेला दिन साजरा करण्यासाठी या पोलीस अंमलदाराने रजा मागितली आहे. लग्नाचा वाढदिवसाला या पोलीस अमलदाराने चक्क पश्चाताप दिवस म्हणून नामकरण केले आहे. आणि तो दिवस साजरा करण्यासाठी या पोलिसाने अर्ज केला आहे. हा अर्ज पाहून पोलीस अधिकारी ही चक्रावून गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *