“म्याव म्याव” प्रकरणी नितेश राणे याना निलंबित करण्याची मागणी
नितेश राणे यांनी दोन दिवसापूर्वी विधान भवनाच्या पायरीवर बसून मागण्यासाठी घोषणा करीत असताना, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधान भवनात प्रवेश करत होते, त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी “म्याव म्याव” अशी घोषणा केली होती, यावरून चांगलेच टीका टिपणीचे राजकारण तापले आहे.
आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस आहे, आज शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करून नितेश राणे याना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
तसेच भास्कर जाधव म्हणाले कि,
दोन बिस्कीट खाऊन चावणार कुत्रा म्हणजे भास्कर जाधव” -”काळ का सोकावला? याचं कारण आज सभागृहात सांगणार आहे. या सभागृहात १२ आमदार निलंबित झाले. त्यानंतर त्या खुर्चीवर मी होतो. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा भरवली. हेच सदस्य नितेश राणे यांनी त्यावेळी वक्तव्य केलं होतं. दोन बिस्कीट देतो, जा त्याला चावून ये, हा चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, असं नितेश राणे म्हणाले होते. याची क्लिप माझ्याकडे आहे. मला दोन बिस्किट घालून मला चावायला सांगितलं, तर मग तुमच्या काळात हरिभाऊ बागडेंनी अनेक आमदारांना निलंबित केलं होतं, तेव्हा फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती?” असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला. त्यानंतर विरोधक चांगले आक्रमक झाले. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. पण, सत्ताधाऱ्यांनी मात्र नितेश राणेंच्या निलंबन करण्याची मागणी केली. सत्ताधाऱ्यांनी नितेश राणे हाय हाय अशा घोषणा सभागृहात झाल्या . त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले पाहायला मिळाले. नितेश राणे यांना निलंबित केल्यास हा लोकशाहीचा खून होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.