कधी होणार महानगरपालिकेच्या निवडणुका? प्रश्न कायम, कोर्टाची सुनावणी ४ मे रोजी
सुप्रीम कोर्टात आज महापालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडणार होती. मात्र ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ४ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं निवडणुकांच्या तारखा आणि प्रभाग रचना करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले. सरकारनं घेतलेल्या या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या १३ याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर सुप्रीम कोर्टात आज सुनाणी होऊन निकाल लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. ही सुनावणी अखेर पुढे ढकलण्यात आली असून. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न अद्यापही कायम आहे. आता ४ मे रोजी या प्रश्नावर निकाल लागतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा : शेतीला समजणे महत्त्वाचे का आहे? एकदा वाचाच
मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड यांना मिळून एकूण 20 पेक्षा अधिक महापालिकांच्या निवडणुका कधी होणार, मात्र यावर होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात अली. महापालिकांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत लांबल्या जाणार का? याबाबत सुप्रीम कोर्टात काय निर्णय देतं, याकडे सगळ्यांचीच लक्ष लागून आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणुका लांबल्याच. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी भूमिका सर्वपक्षीयांनी घेतली आहे. त्यानंतर वॉर्डची रचना करण्याचा अधिकारही सरकारकडे देण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने झालेल्या या निर्णयानंतर आता पालिका निवडणुकांबाबत 4 मे रोजी मोठी निकाल लागतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
हेही वाचा : आता औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त सव्वा तासात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा