खासदार उदयनराजे भोसले अजित पवार यांच्या भेटीला
पुणे :- भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. पुण्यातील विश्रामगृह येथं ही भेट झाली. यावेळी विकासकामांबाबत चर्चा झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा जाणार का ? या प्रश्नावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं सर्वधर्म समभाव धोरणं होतं, तसं आपलं सर्वपक्ष समभाव धोरण आहे असं वक्तव्य उदयनराजेंनी केले .या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. .
या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट लिहिली यात , सातारा नगरपरिषदेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकास कामांना प्राथमिक सोयी सुविधा अंतर्गत अनुदान मिळणेबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रस्तावाद्वारे मागणी केली आहे.