मंत्री अब्दुल सत्तार यांना धक्का दूध संघाच्या उपाध्यक्ष पदी भुमरे गटाचे दिलीप निरफल विजयी

आज दूध महासंघाची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची निवड झाली मात्र उपाध्यक्ष पदावरून शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी मध्ये रस्सीखेच बघायला मिळाली.

यात कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या गटाचे दिलीप निरपळ आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या गटाचे गोकुळ सिंग राजपूत उपाध्यक्षपदासाठी उमेदवार होते.

उपाध्यक्ष पदाच्या निवडीत संदिपान भुमरे गटाचे दिलीप निरपळ यांचा नऊ विरुद्ध पाच मतांनी विजय झाला, तर अब्दुल सत्तार गटाचे गोकुळ सिंग राजपूत यांना पराभव स्वीकारावा लागेल.

जिल्हा दूध उत्पादक संघाचे निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली सुरुवातीला १४ सदस्यांसाठी निवडणुकीचे बिनविरोध प्रयत्न झाले. यात मात्र यश आले नाही भाजप, शिवसेना, काँग्रेस पक्षातील नेते एकत्र येऊन विरुद्ध अपक्ष अशी निवडणूक झाली. मात्र भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलने सर्व जागा जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *