केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे कोरोना बाधित
संपूर्ण देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे, दररोज वाढणारी रुग्ण संख्या मात्र देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. राज्यातील अनेक मंत्री आणि आमदार देखील कोरोना बाधित झाले, त्यात मागील दोन दिवसात राज्यातील दोन केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असक्याचे समोर आले.
केंद्रीय रावसाहेब दानवे याना शुक्रवार दि.७ रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले, त्यांनी लक्षणे जाणवू लागल्याने कोरोनाची चाचणी केली त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याचप्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी. असे मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.
कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी.
धन्यवाद.— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) January 7, 2022