आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ ; पीडितेचा सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही दिवसापूर्वी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता, या संदर्भात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नाईक यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला आहे मात्र त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला तर माझ्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचे पीडित महिलेने एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. गणेश नाईक यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेचा आपल्या जीवाला धोका असल्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाच :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; DA नंतर HRA आणि इतर भत्त्यात भरगोस वाढ होणार ?

पीडित महिलेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय यात तिने सांगितले की , मला आणि माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे कधीही बरे वाईट होऊ शकते. माझ्या अपहरणाची शक्यता आहे किंवा कधीही माझ्या हत्येचा कट रचण्याची शक्यता असून , मला सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती मी करत आहे. मला सरकराकडून जे सहकार्य मिळाले त्यासाठी मी सरकारची आभारी आहे. मला आणि माझ्या मुलाला न्याय मिळेपर्यंत सर्वांनी मला असेच सहकार्य करा.

हेही वाचा :- मंत्री धनंजय मुंडे यांना महिलेची पाच कोटींची मागणी, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करायची धमकी

पीडित महिलेने आमदार गणेश नाईक यांच्यावर आरोप केला आहे कि, गेल्या २७ वर्षांपासून आमचे संबंध होते, यातुन आम्हाला १५ वर्षाचा मुलगा देखील आहे . माझ्या मुलाला वडिलांचे नाव द्यावे अशी मागणी पीडित दीपा चौहान यांनी केली आहे. या प्रकरणामुळे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

हे ही वाचा (Read This)   या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *