बारावी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत चूक, विद्यार्थ्यांना १ गुण मिळणार

काल ४ मार्च पासून बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. राज्यातील ९ हजार ६३५ परीक्षा केंद्रावर १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. काल काल बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये १ गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा १ गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

काल बारावी इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये १ गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी बोर्डासमोर मांडल्या. बोर्ड अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंग्रजी पेपर मध्ये बोर्डाकडून चूक झालेल्या आणि विद्यार्थ्यांने सोडवलेल्या एका प्रश्नाचा १ मार्क विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *